नवी दिल्ली – विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीक्षमतेत १५४ टनांची भर पडेल. यापैकी ३३ प्रकल्पांची संयंत्र कार्यान्वित झाली असून त्यातलं एक महाराष्ट्रात आहे.
आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली,केरळ, पुद्दुचेरी, पंजाब, आणि उत्तर प्रदेशमध्येही प्रत्येकी एक प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मध्य प्रदेशात ५, हिमाचल प्रदेशात ४,तर चंडीगढ, गुजरात आणि उत्तराखंड मधे प्रत्येकी ३ प्रकल्प कार्यान्वित आहे. बिहार, कर्नाटक आणि तेलंगणमधे प्रत्येकी २ प्रकल्प सुरु झाले आहेत.