इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहन कोणते असो त्यामध्ये बिघाड झाला तर अपघात होऊ शकतो, त्यातही विमाना सारख्या अत्याधुनिक वाहनाच्या बाबतीत तर अत्यंत किरकोळ बिघाड देखील प्रवाशांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतो, कारण विमान हे आकाशात अधांतरी उडत असते. त्यामुळे हा धोका अधिक असतो अशाच प्रकारची घटना नुकतीच घडली परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. बिहारमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे.
विमानतळावरून टेक ऑफ करण्यापूर्वी पाटणा ते गुवाहाटी फ्लाइटमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. कारण विमानाच्या दरवाजातून ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे काही सेकंदांनंतर वैमानिकाने वेग वाढवण्यापूर्वीच विमान धावपट्टीवर परत आणले आणि त्यानंतर मोठा धोका टळला. सुदैवाने विमानाने वेग घेतला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. विमानाने उड्डाण केले असते तर पटनाच्या प्रवाशांना श्वसनाचा मोठा त्रास होण्याची खात्री होती. ही कमतरता जास्त काळ राहिल्यास ऑक्सिजनशिवाय श्वास घेणे बंद होऊ शकते.
धावपट्टीवरून टेक ऑफ करताना विमानाचा वेग खूप जास्त असतो. पाटणा विमानतळाच्या धावपट्टीची सर्वात मोठी समस्या म्हणजे धावपट्टी संपताच विमानतळाला लागून सीमा भिंत आहे. अशा परिस्थितीत इमर्जन्सी ब्रेक लावूनही विमानाच्या सीमा भिंतीला धडकणे निश्चित होते. दुसरे, जर वैमानिकाने टेकऑफचा पर्याय निवडला असता, तर विमानाच्या आतील हवेत ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण झाली असती. उड्डाणानंतर विमान उतरायला किमान दहा ते पंधरा मिनिटे लागतील आणि इतका वेळ श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा विचार करून प्रवाशांचा थरकाप उडाला.
विमानाचे इंजिन गरम झालेले असते आणि उच्च दाब असलेली हवा, ज्याला ब्लीड एअर देखील म्हणतात, ती केबिनमधील हवेमध्ये मिसळण्यासाठी अनेक टप्प्यांनंतर थंड केली जाते. त्यासाठी ही आउटफ्लो वाल्वद्वारे केबिनमध्ये सोडले जाते. प्रेशर सेन्सर केबिनमधील हवेची पातळी राखतो. या प्रक्रियेनंतरच 30 हजार फूट उंचीवर प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत नाही.
कारण प्रवाशांना विमानात हवेचा दाब जमिनीवर असतो तसाच जाणवतो. अशा परिस्थितीत विमानाच्या पायलटने एटीसीशी संपर्क साधून विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. केबिनचा दाब योग्य नसल्यामुळे प्रवाशांना हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव होऊ शकतो, ते घातक ठरू शकते. कमी दाबामुळे रक्तप्रवाहात नायट्रोजनचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे सांधेदुखी, अर्धांगवायू, मृत्यू देखील होऊ शकतो.
oxygen leaked through door passenger flight spicejet patna guwahati