बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

म्हणून गेला २२ जणांचा जीव; ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेचा नाशिक महापालिकेने केला हा खुलासा

by Gautam Sancheti
एप्रिल 21, 2021 | 1:51 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20210421 WA0001

नाशिक – डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथील ऑक्सिजन गळती आणि २२ रुग्णांचा बळी गेलेल्या घटनेचा नाशिक महापालिकेने खुलासा केला आहे. ही घटना कशी आणि का घडली याबाबत महापालिका म्हणते आहे की,
नाशिक मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुदैवी मुत्यृ झाल्या प्रकरणी घडलेल्या घटनेचा सविस्तर अहवाल खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे १५० बेडचे कोविड रुग्णालय असुन येथे आज सकाळी १० वाजता १५७ रुग्ण दाखल होते, पैकी १३१ रुग्ण  ऑक्सिजनवर,  १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी १३ KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा १० वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असुन त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही उपरोक्त कंपनीकडे आहे. सदरचा टॅंक  दि. ३१/०३/२०२१ रोजी कार्यान्वित केलेला आहे.
आज दुपारी सुमारे १२.३० वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ माझ्या निदर्शनास आणून दिली. सदरची बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक श्री. शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडर मधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन  गळतीची जागा तज्ञांनी शोधली. सदर गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे ०१.४५ ते ०२.०० वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले.
या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 22 रुग्णांचा मुत्यृ झाला.
त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. वॉर्ड क्र. रुग्णाचे नांव रुग्ण दाखल दिनांक वय/लिंग
1 C1+S.R. अमरदीप नगराळे 13/4/2021 74/पु.
2 भारती निकम 16/04/2021 44/स्त्री
3 श्रावण रा. पाटील 11/04/2021 67/पु.
4 मोहना दे. खैरनार 14/04/2021 60/स्त्री
5 मंशी सु. शहा 16/04/2021 36/पु.
6 पंढरीनाथ दे. नेरकर 11/04/2021 37/पु.
7 C2 सुनिल झाळके 17/04/2021 33/पु.
8 सलमा शेख 06/04/2021 59/ स्त्री
9 प्रमोद वालुकर 08/04/2021 45/ पु.
10 आशा शर्मा 17/04/2021 45/ स्त्री
11 भैय्या सय्य्द 19/04/2021 45/पु.
12 C3 प्रविण महाले 28/03/2021 34/पु.
13 सुगंधाबाई थोरात 18/04/2021 65/ स्त्री
14 हरणाबाई त्रिभुवन 06/04/2021 65/ स्त्री
15 रजनी काळे 18/04/2021 61/ स्त्री
16 गिता वाघचौरे 03/04/2021 50/ स्त्री
17 बापुसाहेब घोटेकर 12/04/2021 61/पु.
18 C4 वत्सलाबाई सुर्यवंशी 20/04/2021 70/ स्त्री
19 नारायण इरनक 20/04/2021 73/ पु.
20 C5 संदिप लोखंडे 19/04/2021 37/पु.
21 बुधा गोतरणे 19/04/2021 69/पु.
22 वैशाली राऊत 18/04/2021 46/ स्त्री
यामध्ये एकूण १२ पुरूष व १० महिला हे ३३ वर्ष ते ७४ वर्ष दरम्यानचे असून ११ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवरील व ११ रुग्ण हे व्हेंटीलेटर बेडवरील आहेत.
मनपाच्या नविन बिटको रुग्णालयात ४ रुग्ण व शहरातील खाजगी रुग्णालयात १ रुग्ण  हलविण्यात आले. दरम्यान इतर ठिकाणचे डयुरा सिलेंडर व जंबो सिलेंडर मागवून त्यांच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा सुरु ठेवून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. सदयस्थितीत रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालू आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरीत कारवाई करा – खासदार डॅा. भारती पवार

Next Post

अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री टोपे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Next Post
rajesh tope 6

अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री टोपे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011