रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कन्नड घाट वाहतूक बंदीबाबत न्यायालयाने दिले हे आदेश… या तारखेपासून लागू होणार…

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
No Entry Traffic

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गावरून केवळ खासगी प्रवासी व सार्वजनिक प्रवासी वाहतुक सुरू राहणार आहे.

चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाट (कन्नड घाट) ११ ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बंदी घातलेल्या वाहनांमध्ये ट्रक, ट्रेलर, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे टँकर, दुधाचे टँकर आदींचा समावेश आहे. या वाहनांसाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-वाकळा-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव हा मार्ग सुचविण्यात आला आहे. या संदर्भात ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले, ॲड. श्रीकृष्ण चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, खासगी आराम बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, अग्निशमन दलाची वाहने, शेतीपयोगी ट्रॅक्टर, ॲम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असेल. इतर जड वाहनांसाठी न्यायालयाने पर्यायी मार्ग सुचवला आहे. औट्रम घाटात दुरुस्तीला परवानगी देतानाच गौताळा अभयारण्यातून जाणाऱ्या गौताळा घाटाच्या दुरुस्ती व इतर कामांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील आरटीओ, दोन्ही ठिकाणे पोलिस अधिक्षक, चाळीसगावच्या पोलिस उपाधिक्षकांना देण्यात आले आहेत.

तरीही मागणी फेटाळली
या घाटातून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केल्याने टोलचे नुकसान होईल, असा मुद्दा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी मांडला. घाटातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचे होणारे हाल, घाटात घडणारे गुन्हे आदींचा संदर्भ देत खंडपीठाने त्यांचे म्हणणे फेटाळले.

outram kannad ghat heavy vehicle banned court order
no entry chhatrapati sambhaji nagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

पत्नीची हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा…

India Darpan

Next Post
court 1

पत्नीची हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा...

ताज्या बातम्या

Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011