मुंबई – कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे लोक घरात बंद होते. बाहेर पडता येत नव्हते आणि टीव्ही-मोबाईलशिवाय दुसरे करमणुकीचे साधनही नव्हते. अश्यात ओटीटीने चांगलीच धूम केली. एकाहून एक दर्जेदार चित्रपट देऊन लोकांना खिळवून ठेवले. पण त्याचवेळी हॉट आणि सेक्सी वेबसिरीज व शॉर्ट फिल्मच्या जोरावरही प्रेक्षकांना आकर्षित केले. बोल्ड सीनच्या अवतीभवती फिरणारे कथानक लोकांपुढे आणले. त्यात अश्लीलतेला कुठलीच सीमा नव्हती. अश्या काही निवडक वेबसिरीजविषयी जाणून घेऊया…
ट्रिपल एक्स (आल्ट बालाजी)
एकता कपूरने या बोल्ड बेव सिरीजचे दिग्दर्शन केले होते. या सिरीजचे कथानक सेक्स, महिला आणि कॉन्ट्रोव्हर्सी या तीनच गोष्टींच्या अवती भवती फिरताना दिसते. ट्रिपल एक्समध्ये शांतनू माहेश्वरी, रित्विक धंजानी, अंकित गेरा यांनी पहिल्यांदाच एवढे बोल्ड सीन दिले आहेत.
माया (एमएक्स प्लेयर)
माया ही अत्यंत बोल्ड वेबसिरीज आहे. विक्रम भटने दिग्दर्शित केल्यामुळे त्यात बोल्ड सीन ठरलेलेच आहेत. मायामध्ये शमा सिकंदरने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने टीव्हीवरील संस्कारी इमेज पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
कविता भाभी (उल्लू)
उल्लू अॅपवर रिलीज झालेली सिरीज कविता भाभी लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. यात सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता राधेश्याम हिची मुख्य भूमिका आहे. ती पुरुषांना रिझविण्याचे काम करताना दिसते.
लस्ट स्टोरीज (नेटफ्लिक्स)
लस्ट स्टोरीजमध्ये एकाचवेळी अनेक कहाण्या दाखविण्यात आल्या आहेत. सेक्सच्या संदर्भातील स्टिरीओ टाईपला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक बोल्ड सीन्स दाखविण्यात आले आहे आणि ते आपण कुटुंबासोबत बसून बघू शकत नाही.
व्हर्जीन भास्कर (झी)
ही सिरीजसुद्धा सेक्स या विषयावरच आधारित आहे. एका अविवाहीत तरुणाची कहाणी यात दाखविण्यात आली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दाखविण्यात आलेली केमेस्ट्री बघून तर घामच फुटायचा.
फँटसी (व्हूट)
या सिरीजचे नाव तसे तर फुह से फँटसी असे आहे. या शोमध्ये करण वाही, प्लाबिता बोरठाकूर, नवीन कस्तुरिया, अंशुमन मल्होत्रा, गौरव पांडे, अनुप्रिया गोयनका ही ओळखीची नट मंडळी आहेत. प्रेम, इमोशन्स आणि बोल्ड सीन हे या सिरीजचे वैशिष्ट्य आहे.
हॅलो मिनी (एमएक्स प्लेयर)
या सिरीजमध्ये सर्वाधिक बोल्ड सीन आणि अॅडल्ट कंटेंट आहे. सिरीजमध्ये प्रिया बॅनर्जी, अर्जुन अनेजा, गौरव चोपडा, मृणाल दत्त, अनुजा जोशी आणि अंकुर राठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिरीजचे 15 एपिसोड असून दुसरा सिझनही रिलीज झालेला आहे.
रसभरी
अभिनेत्री स्वरा भास्करची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज चांगलीच वादात आली. एका शिक्षिकेच्या भूमिकेत असलेली स्वरा भास्कर शाळेत शिकविते आणि बाहेर पुरुषांना रिझविण्याचे काम करते.