विशेष प्रतिनिधी, मुंबई :
सुमारे ६ आठवड्यांपूर्वी सुरू झालेला बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले दि. १८ सप्टेंबर रोजी जल्लोषात झाला असून दिव्या अग्रवाल ही यातील सर्व स्पर्धकांना हरवत विजेती ठरली बिग बॉस ओटीटी करण जोहरने होस्ट केले होते. अंतिम फेरीत दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट, राकेश बापट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यात स्पर्धा लागली होती. विजेत्या दिव्याला ट्रॉफीसह २५ लाख रुपयांची विजयी रक्कम मिळाली आहे. दिव्याने हा शो जिंकला असून निशांत पहिला आणि शमिता सेकंड रनर अप ठरली. गौहरनेही दिव्याचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. दि. ८ ऑगस्टला बिग बॉस ओटीटी रात्री ८ वाजता सुरू झाला. सलमान खान गेल्या अनेक सीझन होस्ट करत असताना, यावेळी बिग बॉस ओटीटी करण जोहरने होस्ट केले होते.
बिग बॉस ओटीटी मध्ये एकूण १३ स्पर्धक सहभागी होते. राकेश बापट, जीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंह, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित अशी या स्पर्धकांची नावे आहेत. उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात शोमधून बाहेर पडला होता. यानंतर करण नाथ आणि रिद्धिमाचा प्रवास संपला. त्याचवेळी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जीशानला बेघर करण्यात आले. त्याचवेळी मिलिंद गाबा, अक्षरा सिंग आणि नेहा भसीन यांना नंतर शोमधून काढून टाकण्यात आले.
विशेष म्हणजे बिग बॉसचा हा ओटीटी संपल्यानंतर आता बिग बॉस १५वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी सलमान खान होस्ट राहणार असून या बिग बॉसचा प्रीमियर दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. तर बिग बॉस शो सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता प्रसारित होईल, तर वीकेंडला तो शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.