वॉशिंग्टन – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या क्युरोसिटी रोव्हर उपग्रहाला मंगळावर सेंद्रीय घटक (संयुगे) सापडले आहे. आता नासाच्या टीमला असे आढळले आहे की, या ग्रहावर सेंद्रीय मीठ देखील असू शकते. जर येथे आणखी संशोधनात मिठाचा शोध लागला, तर या ग्रहावर जीव सृष्टीची चिन्हे स्पष्ट होतील.
नासाचे वैज्ञानिक जेम्स लुईस यांनी प्रयोगशाळेत चाचणी घेतल्यानंतर सांगितले की, क्युरोसिटी रोव्हरवरील पोर्टेबल लॅब डेटावर सेंद्रिय मीठाचे संकेत दिसत आहेत. या ग्रहावर सेंद्रीय घटक आणि मीठ प्रक्रियेची उपस्थिती आपल्याला जीवाणूंच्या शोधापर्यंत नेऊ शकते.
जैविक प्रक्रियेचे पुरावे गोळा करणार
आजही असे समजले जाते की, पृथ्वीवरील जीवसृष्टी ही प्रथम सेंद्रीय मीठ, ऑगलेट्स आणि अॅसीटेट्सवर अवलंबून होती. मंगळावर अन्वेषण करण्यासाठी सेंद्रिय रेणू शोधणे ही नासासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, कारण त्यानंतरच येथे जैविक प्रक्रियेचे पुरावे गोळा केले जाऊ शकतात. तथापि, मंगळाच्या पृष्ठभागावरील किरणोत्सर्गामुळे सेंद्रिय पदार्थाचा नाश होण्याचे आव्हान देखील असू शकते.
मंगळाच्या पृष्ठभागावर ड्रिलिंग
नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील सेंद्रिय वैज्ञानिक जेम्स लुईस म्हणाले, जर आम्हाला मंगळावर कोठेही सेंद्रिय मीठ सापडले, तर त्या भागात अधिक तपासणीची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय सामग्री सुरक्षित आढळली, अशा मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखाली ड्रिलिंग करण्याची आवश्यकता असू शकते.
काय आव्हान आहे?
क्यूरियोसिटी रोव्हरमध्ये बसविलेले उपकरण हे मंगळावर मिठाची भूवैज्ञानिक संशोधन करण्यास अडचणीचे ठरू शकते. कारण हे डिव्हाइस मंगळाची माती आणि खडक गरम करते ज्यामधून वायू उत्सर्जित होतात. त्यामुळे शास्त्रज्ञांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.