शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ का आहे… पाश्चात्य देशांमध्ये काय स्थिती आहे… भारतात एवढे अल्प प्रमाण का आहे?

by India Darpan
एप्रिल 9, 2023 | 5:06 am
in इतर
0
Organ Donation

आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान
अवयवदानाचा बाळगा अभिमान

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त अवयवदानाची गरज विशद करणारा लेख..

– अविनाश गरगडे
जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले, तर भारतात १९७१ मध्ये सीएमसी वेल्लोर येथे करण्यात आले. दुर्दैवाने ५० वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज आपल्याकडे जे काही अवयव प्रत्यारोपण होत आहे, त्यात बहुसंख्य थेट संबंधित दात्यांकडून आहेत, तर ब्रेनडेड रुग्णांचे कॅडेव्हरिक अवयवदान नेहमीच मागे राहिले आहे. या उदात्त आणि मानवी कारणासाठी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात दहा हजारांपैकी केवळ एक रुग्ण अवयवदानासाठी संमती देतो, तर पाश्चिमात्य देशांत १० हजार लोकसंख्येपैकी सुमारे ३५०० लोकांमध्ये अवयवदानासाठी संमती मिळते.

सध्या भारतात सुमारे ५७० अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून केवळ १४० नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरे म्हणजे यातील बहुसंख्य खाजगी संस्था आहेत, जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही.

सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे. मात्र दरवर्षी केवळ ४००० मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जात असून, हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. जेव्हा लोकसंख्येने हे पारंपरिक प्रत्यारोपण स्वीकारले नाही, तेव्हा हात प्रत्यारोपणासारख्या नवीन पद्धतींचा विचार करणे खूप कठीण आहे.

रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतात. एक ब्रेनडेड रुग्ण २ मूत्रपिंड, १ यकृत, १ हृदय, २ फुफ्फुस, १ स्वादुपिंड यांचा संभाव्य दाता असून एकाच वेळी ७ जीव वाचवू शकतो. तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो.

राज्यातील ११ कोटी २३ लाख लोकसंख्येतून केवळ ४९ हजार अवयवदानाची शपथ घेऊन महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी केवळ ७२ केंद्रे, यकृत प्रत्यारोपणासाठी ३६ केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी ९ केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत. राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही फारच कमी आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि त्याचा अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून अवयव दान जनजागृती अभियान नक्कीच मदतीचे ठरेल. यातून प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती होईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

सध्याच्या मिशनच्या माध्यमातून अवयवदानासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदात्यांची संभाव्य यादी वाढविणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. तसेच नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून उपाय शोधले जात आहोत.

Organ Donation Awareness Campaign

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनरेगामुळे गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाला हा मोठा बदल… खुद्द आयुक्तांनीच उलगडलं…

Next Post

मालेगावच्या भावना निकम या शेतकरी महिलेने करुन दाखवलं… अशी आहे तिची जबरदस्त यशोगाथा

Next Post
1140x570 2

मालेगावच्या भावना निकम या शेतकरी महिलेने करुन दाखवलं... अशी आहे तिची जबरदस्त यशोगाथा

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011