रविवार, जुलै 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑरेंज सिटी पार्क योजनेचे बांधकाम थांबवले…PMAY गैरव्यवहाराची चौकशी सुरू

by Gautam Sancheti
जुलै 7, 2025 | 8:03 am
in संमिश्र वार्ता
0
1001669477

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान आवास योजनेत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत गंभीर गैरप्रकार, फसवणूक आणि नियमभंग उघड झाल्यानंतर मुंबईतील म्हाडा, PMAY प्राधिकरणाने, वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथे सुरू असलेले या योजनेचे बांधकाम तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजना प्राधिकरण, मुंबई यांनी १ जुलै २०२५ रोजी योजनेचे वास्तुविशारद आलोक लुनिया यांना पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यापूर्वी १० जून २०२५ रोजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली ठाकरे यांच्या तक्रारीवर बैठक झाली होती. त्यांनी चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात, २ जून २०२५ रोजी आमदार ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत तक्रार दिली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी डॉ. भोयर यांना यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

PMAY अंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरस्थित मिलेनियम डेव्हलपर्स अ‍ँड प्रमोटर्स प्रा. लि. या कंपनीने वानाडोंगरी (खसरा क्र. ३८० आणि ३८१) येथील जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मल्टी-स्टोरी फ्लॅट्स आणि व्हिला बांधण्याचे काम सुरू केले आहे. परंतु या संपूर्ण योजनेत नियमांचे उल्लंघन, प्रकल्पाच्या मंजुरीत फसवणूक व नागरिकांची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने तातडीने हस्तक्षेप करत बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असून, चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

बनावट रस्त्यावर मंजुरी मिळवली:
लेआउट मंजुरीसाठी मुख्य रस्ता असणे बंधनकारक असताना, बिल्डरने बनावटपणे असा रस्ता दाखवला, जो प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. आश्चर्य म्हणजे, ज्या जागेवर १८ मीटर रुंद रस्ता दर्शवण्यात आला आहे, ती जमीन मंजुरीच्या दिवशी आणि आजतागायतही बिल्डरच्या मालकीची नाही. तरीदेखील म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सदर लेआउट व इमारत नकाशाला बिनधास्त मंजुरी दिली.

चुकीच्या विकास आराखड्याचा आधार:
वानाडोंगरी २०१६ पासून नगरपरिषद आहे आणि त्या भागावर प्रादेशिक योजना (Regional Plan) लागू आहे. मात्र, म्हाडाने या लेआउटच्या मंजुरीसाठी नागपूर महानगर प्राधिकरणाचा (NMRDA) विकास आराखडा (Development Plan) विचारात घेतला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रादेशिक योजनेत सदर लेआउटपर्यंत कोणताही रस्ता प्रस्तावित नाही. त्यामुळेच म्हाडाने २०२१ मध्ये या लेआउटला मंजुरी देताना NMRDA च्या मसुद्यातील प्रस्तावित रस्त्याचा आधार घेतला.

रस्ता नसतानाही प्लिंथ सर्टिफिकेट जारी:
वानाडोंगरी नगरपरिषदेची मंजुरी न घेता व प्रत्यक्ष रस्ता तयार नसताना, म्हाडाने बांधकामाला प्लिंथ सर्टिफिकेट दिली.

फायर NOC व स्ट्रक्चरल मंजुरीशिवाय नकाशा मंजूर:
फायर NOC नसतानाही अनेक ८ मजली इमारतींच्या नकाशांना बिनधास्त मंजुरी देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्पष्ट उल्लंघन:
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल Stability Certificate व फायर NOC न घेता काही व्हिलांचे ताबे ग्राहकांना देण्यात आले. काही नागरिक तिथे वास्तव्यासही आहेत. ही बाब दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या थेट विरोधात जाते (सिव्हिल अपील क्र. १४६०४/२०२४).

पर्यावरण व नागरी नियमांचा संपूर्ण बडगा उडवला:
सीवेज डिस्पोजल यंत्रणा, मालमत्ता कर मूल्यांकन, तसेच वानाडोंगरी नगरपरिषदेची आवश्यक परवानगी न घेता संपूर्ण योजना उभारली. सांडपाणी शेजारील शेतीमध्ये सोडले जात आहे.

शेतजमीन बळकावल्याचे आरोप:
शेजारील शेती भूधारकांनी तक्रारी करत म्हटले की, बिल्डरने त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला आहे. याबाबत नगरपरिषद, पोलिसांकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. आणि बिल्डरने सांडपाणी शेजारील शेतीमध्ये सोडले आहे.

आमदार ठाकरे यांचा मागणी:
मुंबई आणि नागपूर येथील म्हाडा अधिकाऱ्यांनी फसवणुकीच्या क्लृप्त्या आणि गंभीर नियमभंग करत लेआउट व इमारत नकाशांना मंजुरी दिली, तसेच बिल्डरला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवून दिला. अनेक नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून या योजनेतील व्हिला आणि फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण विभागाने संपूर्ण योजनेचा तातडीने ताबा घ्यावा आणि संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांसह बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा, अशी ठोस आणि स्पष्ट मागणी आमदार विकास ठाकरे यांनी तक्रार द्वारे केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेरिकेत टेक्सास राज्यात भीषण पुरामुळे ४९ जणांचा मृत्यू….२७ मुले बेपत्ता

Next Post

राज ठाकरे यांच्या या आदेशाने ठाकरे गट – मनसे युतीबाबत संभ्रम वाढला…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled

राज ठाकरे यांच्या या आदेशाने ठाकरे गट - मनसे युतीबाबत संभ्रम वाढला…

ताज्या बातम्या

daru 1

पुण्यात रेव्ह पार्टीत पोलिसांचा छापा…एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात

जुलै 27, 2025
anjali damaniya

धनजंय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात कदापी सहन करणार नाही…अंजली दमानिया यांची पोस्ट

जुलै 27, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख लाभार्थी अपात्र…पुरुषांनी अर्ज केल्याचे आले समोर

जुलै 27, 2025
TEMA2BRPB

देशातील पहिली ही खासगी चाचणी सुविधा सुरू…

जुलै 27, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी इतक्या लाखाच्या निधीस मान्यता

जुलै 27, 2025
jalgaon collector

या राष्ट्रीय महामार्ग बायपासचे प्राथमिक काम पूर्ण…जिल्हाधिकारी व सल्लागारांची संयुक्त पाहणी

जुलै 27, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011