नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात विविध ठिकाणांना भेट दिली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेल्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुंबईवरील प्रेम अतिशय बेगडी असल्याचे ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील सिन्रर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व रहिवाशांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी दानवे आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचे काम सुरू आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे.
दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तत्काळ मदत करण्याचेही त्यांनी सूचित केले. बुलेट ट्रेनच्या कामासाठी येण्यापेक्षा नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या शेतात यावे, असे म्हणत त्यांनी शहांचा समाचार घेतला. अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्र सोशिक राहिला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल, असेही ते म्हणाले. आशिष शेलारांवर टीका करताना ते म्हणाले, की शिवसेना कोणती आणि कशी सेना आहे, हे निवडणुकीच्या मैदानातच स्पष्ट होईल. आशिष शेलारच काय सर्व विरोधकांना ते दाखवून देईल. महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित १२ आमदारांच्या यादीवर निर्णय घेण्याची तत्परता राज्यपालांनी दाखविली, असा टोलाही त्यांनी लगावला.
https://twitter.com/iambadasdanve/status/1566665937696309249?s=20&t=JfEu_y-B9tLOUhOnv8TsYQ
Opposition Leader Ambadas Danve on Amit Shah Mumbai Tour
Critic Politics Governor Shivsena