इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्पराबादमध्ये ९ ठिकाणावर स्टराइक केला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, थोड्या वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले गेले.
एकूण नऊ (९) स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केले आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुठल्या-कुठल्या ठिकाणी हे स्ट्राइक केले आहे ते बघा सविस्तर….
बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.
मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता.
गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून ३५ किलोमीटर दूर आहे.
लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये ३० किलोमीटर आत आहे.
बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.
कोटली : LOC पासून १५ किमी अंतरावर लष्करचा तळ होता. ५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.
बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून १० किलोमीटर अंतरावर आहे.
सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.
मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी अंतरावर होता.
