मुंबई – आम्हां घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्द हे शस्त्र असे आपण ऐकत आलो आहोत. पण, एकेका शब्दाची पैशातील किंमत फामृर मौल्यवान आहे. अवघ्या १४ शब्दांची किंमत चक्क दीड कोटी रुपये आहे, असे कुणी सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का. नाही ना. पण हे खरे आहे. ऐतिहासिक अशा १४ शब्दांना दीड कोटींची बोली लागली आहे. त्यामुळे त्याची जगभरात चर्चा होत आहे.
व्होडाफोन ही टेलिकॉम कंपनी जगातील पहिल्या एसएमएसचा लिलाव करणार आहे. विशेष प्रतिनिधी हा जगातील पहिला एसएमएस 14 शब्दांचा असून तो 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत लिलावासाठी ठेवण्यात आला आहे. या एसएमएसचा नॉन-फंगीबल टोकन (NFT) म्हणून लिलाव करण्यात येणार आहे.
याबाबत कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केले आहे की, व्होडाफोन कंपनी जगातील पहिला SMS मजकूर लिलाव करण्यासाठी NFT मध्ये रूपांतरित करत आहे. लिलावात $2 लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 1,52,48,300 रुपयांपेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे. कंपनी लिलावाने मिळालेली ही रक्कम निर्वासितांच्या मदतीसाठी दान करणार आहे.
पहिला एसएमएस 1992 मध्ये पाठवण्यात आला होता. जगातील पहिला एसएमएस 3 डिसेंबर 1992 रोजी व्होडाफोन नेटवर्कद्वारे पाठवण्यात आला होता. सुमारे तीन दशकांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या एसएमएसमध्ये ‘मेरी ख्रिसमस’चा संदेश होता. व्होडाफोनचे कर्मचारी रिचर्ड जार्विस यांनी ते स्वीकारले. जगातील पहिल्या SMS NFT चा लिलाव 21 रोजी पॅरिसमध्ये होणार आहे. लिलावात बोली लावण्यासाठी आपण ऑनलाइन देखील भाग घेऊ शकता.
वोडाफोनने आश्वासन दिले आहे की, 1ल्या आवृत्तीत विशेष NFT तयार करण्यात आला आहे आणि भविष्यात जगातील हा पहिला SMS दुसरा NFT तयार करणार नाही. NFT घेणार्या खरेदीदारांना वोडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र देखील दिले जाईल.
एका अहवालानुसार, या लिलावात 2 लाख डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. वोडाफोनने या लिलावात जमा झालेली रक्कम UNHCR ला दान करणार असल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे युद्ध आणि इतर कारणांमुळे बेघर झालेल्या सुमारे 8.24 कोटी नागरिकांना मदत होईल.