मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ऑनलाइन मिठाई मागविणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. अवघ्या १ हजार रुपयांची मिठाई तब्बल अडीच लाख रुपयांना पडली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे . त्यानुसार, अंधेरीच्या उपनगरात राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेला फूड डिलिव्हरी अॅपवर मिठाई ऑर्डर केली. मात्र, यापोटी तिची १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पूजा शाह (वय ४९) नावाच्या महिलेने रविवारी फूड डिलिव्हरी अॅपवर मिठाई ऑर्डर केली आणि १ हजार रुपये ऑनलाइन भरण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवहार अयशस्वी झाला. त्यानंतर पूजाने मिठाईच्या दुकानाचा नंबर ऑनलाइन मिळवला. विक्रेत्याच्या वतीने एका व्यक्तीने तिला तिचा क्रेडिट कार्ड नंबर आणि तिच्या फोनवर मिळालेला OTP शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने कार्डचे तपशील आणि ओटीपी पुरुषासोबत शेअर केला. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच तिच्या खात्यातून २ लाख ४० हजार ३१० रुपये कापले गेले.
ही बाब लक्षात येताच या महिलेने तातडीने पोलास धाव घेतली. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे महिलेला तिचे बहुतांश पैसे परत मिळवण्यात यश आले. ओशिवारा पोलिसांनी तब्बल २ लाख २७ हजार २०५ रुपये इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करणे थांबविले. वेळेवर पोलिसांची मदत मिळाल्यानेच हे शक्य झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Online Sweet Order Cyber Fraud Cheating Lakh Rupees