इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागे ग्राहक जागो
ग्राहक राजा फसला आहेस तर ऑनलाईन मोफत तक्रार अशी करा
सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. अगदी किरकोळ पदार्थांपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सारेच ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे सहाजिकच ऑनलाईन खरेदीकडे सगळ्यांचा कल आहे. मात्र, यात फसवणूकही मोठा आहे. अशी फसवणूक झाल्यानंतर तक्रार कुठे आणि कशी करायची याची माहिती असंख्य ग्राहकांना नाही. आज त्याविषयीच जाणून घेऊ…
ग्राहक राजा आपल्या छोट्या छोट्या तक्रारीसाठी आपण न्यायालयात जायला कंटाळा करतो आणि त्याचाच फायदा बऱ्याच फसवणाऱ्या कंपनी घेतात. आपण एखादा मोबाईल रिचार्ज केला पण रिचार्ज झाला नाही आणि ५० रुपयाला चुना लागला. ऑनलाईन वस्तू खरेदी केली पण वस्तू खराब आहे ती बदलून दिली जात नाही.
बँकेत तक्रार केली पण तरीही बँक लक्ष देत नाही.
मोबाईल खरेदी केला आहे तो लगेच खराब झाला आणि सर्व्हिस सेंटर वर जावे लागत आहे.
पोस्टाने, कुरिअर ने पत्र पाठवले आहे पण ते मिळालेच नाही.
एखादे दुकानदार लोक आपणास कपडे, वस्तू बदलून देत नाहीत.
एखादी वस्तू खराब निघाली आहे आणि ती एक्सपायरी झालेली आहे त्याबाबत तक्रार करायची आहे.
दुकानदार किमतीपेक्षा(एमआरपी) जास्त पैसे आकारात आहे.
ऑनलाईन फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर कपडे,वस्तू खरेदी करत असताना फ्रॉड झाला आहे आणि वस्तूच मिळत नाही आणि त्याची किंमत तशी किरकोळ आहे.
अशा छोट्या छोट्या तक्रारी बाबतीत ग्राहक हे ग्राहक आयोगात, पोलिसांकडे जाणे साठी कंटाळा करतात.
कित्येक वेळेला अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे विचारणा होते की एखादी ऑनलाईन तक्रार व्यवस्था असेल सांगा कारण कित्येक लोकांना खरोखरच वेळच नसतो आणि अशा गुन्हेगार लोकांचे मागे लागणे शक्य नसते.
ग्राहक मित्रानो फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडियाचे माध्यमातून लाखो लोकांपर्यंत असे गुन्हेगार पोहोचतात आणि त्यामुळे त्यांना आपल्या सारखे हजार एक लोक जरी रोज मिळाले तरी ते रोज लाखो रुपये असे फसवणूक करून कमावत आहेत.
केंद्र सरकारने यावर एक तोडगा काढायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्यासारख्या वेळ नसलेल्या लोकांना हातातील मोबाईल द्वारे तक्रार करणे साठी एक ॲप तयार करून एक तक्रार करणेचा पर्याय सुरू केला आहे.
सदर ॲप द्वारे आपण तक्रार करू शकता. आता काही लोकांना या ॲपचा फायदा झाला आहे तर काही लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पण आपण एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.
तेव्हा ग्राहक मित्रानो आपणास त्या ॲप बाबत थोडी माहिती देत आहे ती वाचून सदर ॲप गुगल प्ले स्टोअर वरून किंवा ऍपल प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घरी बसल्या बसल्या तक्रार करा.
या ॲपचे नाव आहे नॅशनल कन्झुमर हेल्पलाईन (National Consumer Helpline).
ॲप डाऊन लोड झालेवर आपण
आधी आपल्या मोबाईल नंबर द्वारे त्यात आपले नाव रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर आपले एक अकाऊंट तयार होईल आणि आपल्याला आपली तक्रार त्यात दाखल करता येईल.
आपण आपली तक्रार दाखल करताना त्यात लागणारे पुरावे अडोब स्कॅन द्वारे स्कॅन करून अपलोड करू शकता. आडोब स्कॅन हे देखील गूगल प्ले स्टोर वर आहे.
आपण पुरावे म्हणून बिल, ऑनलाईन खरेदी शॉट, फेसबुक जाहिरात याचे स्क्रीन शॉट, पैसे दिल्याचे स्क्रीन शॉट असे आपण त्यात पुरावे म्हणून देऊ शकता.
आपली तक्रार सोडवणे साठी हे ॲप भारत सरकारचे ग्राहक मंत्रालयने तयार केले आहे.
ग्राहक मित्रानो समजा आपली तक्रार इथे सुटली नाही आणि आपल्याकडे जर चिकाटी असेल तर आपण ग्राहक आयोगातही तक्रार दाखल करू शकता.
पण आधी अशी ऑनलाईन तक्रार करून प्रयत्न तरी करून पाहू.* नाही सुटली तर एक ईमेल द्या पाठवून पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर.
आपणास अजून एक विनंती की आपण जर असे एखाद्या कंपनी कडून, व्यक्ती कडून फसला असाल, आपल्याला असा वाईट अनुभव आला असेल तर गुगलवर, फेसबुकवर, ट्विटरवर आणि व्हॉट्सॲपवर आपले अनुभव त्याचे स्क्रीन शॉट टाकून, फोन नंबर टाकून, वेबसाईट माहिती टाकून, वेब पेज माहिती टाकून शेअर करा आणि इतर ग्राहकांना जागे करा.
जागो ग्राहक जागो ह्या सरकारी जाहिरातीने आपण सर्व ग्राहक जागे नाही होणार तर आपणच असा थोडा थोडा पुढाकार घेऊन ग्राहकांना जागे करायचे आहे.*
आपणास एक महत्त्वाचा सल्ला तो असा की आपण आपले अनुभव शेअर करताना एक करा आपले फक्त अनुभवच शेअर करा त्यात ह्या कंपनीचे हे प्रॉडक्ट घेऊ नका, ही कंपनी वाईट आहे असे कधीच लिहू नका नाहीतर तीच कंपनी आपल्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करतील. पण आपण आपल्याला आलेला अनुभव म्हणून शेअर केला तर कोणतीही कंपनी आपल्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करू शकणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत नुकताच एक निकाल दिला आहे त्यात आपले आलेले वाईट अनुभव सोशल मीडिया वर शेअर करणे काहीही चूक नाही असे म्हणले आहे*.
तेव्हा ग्राहक राजा आपल्या छोट्या छोट्या तक्रारी नॅशनल कन्झुमर हेल्पलाईन वर सोडवणे साठी प्रयत्न करा आणि या बोकाळलेल्या फसव्या लोकांना धडा शिकवा. इतर ग्राहकांना सावध करा. ग्राहक एक होत नाही त्यांना एकत्र करणेसाठीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही आपली संस्था काम करते तेव्हा abgpindia या वेबसाईट वर जाऊन मेंबर बना.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*नागपूर*: श्री विलास ठोसर 7757009977
*परभणी*’: डॉक्टर विलास मोरे 8180052500
Online Purchasing Cheating Fraud Complaint Options by Vijay Sagar
Jago Grahak Jago Consumer Crime Cyber