वॉशिंग्टन – अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस सध्या अंतराळात जाण्याची तयारी करत आहेत. आपल्या भावासोबत अंतराळ प्रवासाला ते २० जुलै रोजी प्रारंभ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, बेझोस यांना पृथ्वीवर परत येण्यापासून रोखण्यासाठी ऑनलाइन याचिका समोर आली आहे. यामध्ये, बेझोस यांना पृथ्वीवर येण्यापासून रोखले पाहिजे यावर ४१ हजार लोकांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था घर का ना घाट का अशी होण्याची शक्यता आहे.
बेझोस यांच्या स्पेस स्टार्टअप ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळात यान पाठविले जाणार आहे. पण चेंज डॉट ओआरजी वरील याचिकेत हजारो जणांची अशी इच्छा आहे की, त्यांनी पृथ्वीवर परत येऊ नये. बेझोस हे त्यांचे भाऊ मार्क बेझोस यांच्यासह अवकाशात जाण्याची घोषणा केली आहे. त्याच्या अवघ्या तीन दिवसानंतर या दोन्ही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

			







