नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबत मोठा संभ्रम विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होता. अखेर परीक्षा ऑफलाइन पध्दतीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण शिक्षण ऑनलाइन आणि परीक्षा ऑफलाइन यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे, अनेक प्रश्न आहेत. याविषयी नाशिकच्या रंगुबाई जुन्नरे हायस्कूलच्या मुख्याधापिका सौ. नंदा पेठकर यांच्याशी इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खास चर्चा करणार आहोत. नंदा पेठकर यांचा शिक्षण क्षेत्रातील २२ वर्षांचा अनुभव आहे. २०१५ पासून त्या मुख्याधापिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी (४ फेब्रुवारी) सकाळी सव्वा दहा वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कशी तयारी करावी हे जाणून घेणार आहोत.
ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://fb.me/e/29ctXcQW0