कोल्हापूर – श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी माता ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. अनेक जण अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण नवरात्रीत कोल्हापूरला येत असतात. मात्र, यंदा कोरोना निर्बंधांनंतर मंदिरे पुन्हा खुली झाली आहेत. तरीही लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही. तसेच, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतले आहे त्यांनाच दर्शनासाठी प्राधान्य दिले जात आहे. अशा स्थितीत आपण घरबसल्या अंबाबाईचे दर्शन घेऊ शकतात. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.