नाशिक – राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान तर्फे निमंत्रितांचे ऑनलाईन कोरोना जनजागृती संमेलन आज १५ रोजी सायंकाळी ७ वाजता पार्श्वगायक नंदेश उमप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर कवी गझलकार अशोक भालेराव, नुमान शेख, तारका जाधव, सुनीता इंगळे, प्रशांत धिवंदे, निलेश पवार, रमेश बुरबुरे, बबन सरोदे, भास्कर अमृतसागर, सोनाली सोनटक्के रविराज सोनार मधुकर जाधव सुनील खरे आदी मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक यांना गीतातून अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती प्रा शरद शेजवळ यांनी दिली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांना हे कवी संमेलन http://youtu.be/mCWymFtUzk या लिंकला भेट देत पाहता येणार असल्याची माहिती प्रा.शरद शेजवळ यांनी दिली आहे.