नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, २०२५ अर्थात ऑनलाईम गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयक २०२५ संमत झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
या विधेयकातून भारताला गेमिंग, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनण्याप्रति केंद्र सरकारची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित होत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. या विधेयकामुळे ई-स्पोर्ट्स अर्थात ई-क्रीडा आणि ऑनलाइन सामुदायिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळेल, त्याच वेळी पैशांवर आधारित ऑनलाईन खेळांच्या नुकसानकारक दुष्पपरिणामांपासूनही समाजाचे संरक्षण होईल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हे विधेयक संमत झाल्यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला प्रतिसाद, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केले, या विधेयकातून भारताला गेमिंग, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनण्याप्रति आमची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित होते. या विधेयकामुळे ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सामुदायिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळेल. त्याचवेळी हे विधेयक पैशांवर आधारित ऑनलाईन खेळांच्या नुकसानकारक दुष्पपरिणामांपासूनही समाजाचे संरक्षण करेल.