नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने १५५२६० हा हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास लोकांनी त्वरित या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या नंबरवर फोन केल्याच्या ७ ते ८ मिनिटांच्या आत पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. तुमची रक्कम त्या खात्यात किंवा आयडीवर ट्रान्सफर होईल. सरकारच्या १५५२६० हेल्पलाइनवरून त्या बँक किंवा ई संकेतस्थळाला मेसेज पोहोचेल. त्यानंतर आपली रक्कम होल्ड केली जाईल.
ऑनलाइन तक्रार
ऑनलाइन फसवणूक झाल्यास १५५२६० नंबर डायल करून तक्रार दाखल करू शकतात. त्यानंतर हेल्पलाईन नंबरवर प्राथमिक चौकशीत आपले नाव, मोबाईल नंबर, फसवणूक झालेली वेळ, बँक खात्याचा नंबर अशी माहिती घेतली जाईल. त्यानंतर हेल्पलाईन नंबर तुमची माहिती पुढील कारवाईसाठी पोर्टलवर पाठवून दिली जाईल. त्यानंतर संबंधित बँकेला फसवणुकीची माहिती दिली जाईल. माहिती खरी असल्यास फसवणुकीची रक्कम थांबविली जाईल. त्यानंतर तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ओटीपी, लिंक आणि इतर मार्गांनी फसवणूक होणार्या लोकांसाठी सायबर पोर्टल http://cybercrime.gov.in/ आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल १५५२६० सोबत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या भारतीय सारबर क्राइम को-ऑर्डिनेशन व्यासपीठावर सर्वात प्रथम दिल्लीला जोडण्यात आले आहे. त्यानंतर राजस्थान आणि त्यानंतर देशातील इतर राज्यांना यात सहभागी करून घेतले जाईल. सायबल सेलला जवळपास ५५ बँक, ई वॉलेट्स, ई कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवेज आणि इतर संस्थांना जोडण्यात आले आहे.