विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान काळात एकीकडे ऑनलाईन आर्थिक व्यवहाराचा कल झपाट्याने वाढला असताना दुसरीकडे मात्र बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी सर्तक राहून काळजी घेण्याची गरज आहे. याकरिता एक हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही फोन करून फसवणुकीची तक्रार ऑनलाइन नोंदवू शकता.
देशभरात बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक 155260 प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकावर फोन करून फसवणुकीच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतात. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे बँकिंग फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तीला संपूर्ण मदत दिली जाईल. दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आदि राज्य हे एसबीआय ते आयसीआयसीआय बँक या खाजगी बँका या हेल्पलाईन क्रमांकाशी जोडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त, नंबर मोबीक्विक, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-वॉलेट प्लॅटफॉर्मशी जोडला गेला आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करता आला नाही, तर cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता. ऑनलाइन व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ऑनलाईन खरेदी केल्यानंतर आपल्या कार्डाची माहिती कधीही प्लॅटफॉर्मवर सेव्ह करू नका. यामुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. यासाठी लक्षात ठेवा की, पेमेंट केल्यानंतर त्या कार्डची माहिती डिलीट करा. ऑनलाइन पेमेंट किंवा व्यवहार करण्यासाठी सार्वजनिक वाय-फाय आणि सायबर कॅफे वापरू नका. असे केल्याने आपण ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरू शकता. कोणतेही ऑनलाईन पेमेंट कराल, खाजगी वाय-फाय किंवा मोबाईल नेटवर्क वापरा. यामुळे बँकेत जमा केलेले आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील.