नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचा वांदा काही भारतीयांना नवीन नाही. कधी भाव पडल्याने हा शेतकऱ्यांना रडवतो. तर कधी अचानक उंची गाठून सामान्यांचे बजेट बिघडवितो. अशा या कांद्याची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी अतिरिक्त झाल्याने कवडीमोल ठरत असून काही देशांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी आफ्रिका, अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम शेतीमालाच्या उत्पादनावर झाला होता. त्यामध्से कांदाची निर्यात करणाऱ्या नेदरलँडचादेखील समावेश आहे. फिलिपिन्स येथे मागील वर्षी ऑगस्टमध्ये वादळ आले होते. मोरोक्कोमध्ये पूर आला होता. पाकिस्तानच्या सिंध, पंजाब प्रांतातील काद्यांचे पीक महापुरात उद्ध्वस्त झाले होते. जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या चीनमध्येही मागील वर्षी दुष्काळजन्य स्थिती होती. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षी कांदा उत्पादन घटले होते. वातावरणातील बदलांमध्ये उझबेकिस्तान, ताजिकीस्तान, कझाकस्तान आणि किर्गिझस्तानमधील कांदा पीक नष्ट झाले होते. परिणामी आता कझाकस्तानने किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकीस्तानसह देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
भारतात स्थिती उलट
भारत हा जगातील कांदा उत्पादक देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू आर्थिक वर्षांत देशातून कांद्याची विक्रमी निर्यात होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात १३.५४ लाख टन काद्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ही निर्यात ३८ टक्क्यांनी जास्त आहे. भारतीय कांद्याचे दर कमी असल्यामुळे निर्यात वेगाने झाली आहे.
काय म्हणतो ब्लूमबर्गचा अहवाल?
ब्लूमबर्गने संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या आकडेवारीचा हवाला देत जगातील तीन अब्ज लोक पौष्टिक जेवण घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. महागाईमुळे जगात पौष्टिक अन्नापेक्षा पिष्टमय धान्य, साखर आणि वनस्पती तेलांचा आहारात वापर वाढला आहे. याचाच अर्थ जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात आल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करताहेत.
Onion Production Worldwide Statues Farmer Price