नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांची थेट मुलाखत आपल्याला पहायला मिळणार आहे. शनिवारी (२२ जानेवारी) सकाळी १० वाजता इंडिया दर्पणच्या फेसबुक पेजवर ही मुलाखत प्रसारित होणार आहे. इंडिया दर्पणच्या प्रतिनिधी बागेश्री पारनेरकर या मुलाखत घेणार आहेत.
देशातील कांदा उत्पादक शेतक-यांची ही पहिली संघटना असून देशभर त्याचे जाळे आहे. या संघटनेची स्थापना १५ ऑगस्ट २०१५ रोजी झाली. कांदा बियाणे तयार करणे कांद्याचे रोपे, कांदा लागवड, कांद्याचे संगोपन, कांदा काढणी यासोबतच कांदा विक्रीच्या बाबतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे या उद्देशाने गेल्या ६ ते ७ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे व संघटनेच्या ३५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून कांदा उत्पादकांच्या दैनंदिन व दीर्घकालीन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काम करत आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही स्वतंत्र कांदा उत्पादकांची संघटना असून ही संघटना देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव कांदा उत्पादक संघटना आहे. आज संघटनेकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश बिहार, तेलंगणा आदी राज्यांमधून ३ लाखांपेक्षा जास्त कांदा उत्पादक शेतकरी जोडले गेलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना देशातील सर्वाधिक मोठे सोशल मीडियाचे जाळं असणारी संघटना असून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांद्याच्या शेती बद्दल सर्व ती माहिती त्याचबरोबर देशातील व राज्यातील विविध बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव व कांद्या संदर्भातील सर्व मागील व चालू घडामोडींची माहिती देण्याचे काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा संघटनेकडून केले जात असून कांदा उत्पादक संघटनेचे ११०० पेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप त्याचबरोबर २ लाखांपेक्षा जास्त फेसबुकच्या ग्रुप मध्ये शेतकऱ्यांना जोडण्यात आलेले आहे. या संघटेची माहिती आपण शनिवारी थेट बघणार आहोत. ही मुलाखत पाहण्यासाठी आताच खालील लिंकवर क्लिक करावे. जेणेकरुन मुलाखत सुरू होताच आपल्याला नोटिफिकेशन (सूचना) मिळू शकेल.
https://www.facebook.com/events/674705637236855/?sfnsn=wiwspmo