नाशिक – कांद्याला काय दर मिळावा हा विचार कांदा उत्पादक म्हणून करण्याऐवजी कांदा काय दराने विकावा हा विचार करण्याची खऱ्या अर्थाने आज गरज असल्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. आपला कांदा आपलाच भाव या मोहिमे अंतर्गत कांद्याचे दर ठरविण्याचे काम आपण कांदा उत्पादक शेतकरीच करणार असल्याचा विश्वासही त्यांनी शेतक-यांना दिला.
त्यांनी अपलोड केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका अशी आहे की कांदा हा कमीत कमी ३० रुपये प्रति किलो पेक्षा जास्त व पुढे ५० रुपये १०० रुपये १५० रुपये २०० रुपये असा कितीही दराने विकत असला तरी तरी तो आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आपल्या मालाची किंमत आपणच ठरवली पाहिजे त्याला कोणाचाही विरोध असण्याचे काही कारण नाही.
ज्यांचा ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे त्यांनी कांदा स्वतः पिकवून स्वतःची सोय करून घ्यावी. कांद्याला खूप जास्त दर मिळाला तर सर्व शेतकरी कांदाच लागवड करतील हा खुप मोठा गैरसमज आहे. कारण कांद्याची लागवड केली आणि कांदा तयार झाला असे अजिबात होत नाही. त्यासाठी अतिशय मोठे कष्ट निसर्गाची साथ व पिढ्यानपिढ्या कांदा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कांदा पिकविण्याचे नियोजन तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वच भागात कांदा तयारही होऊ शकत नाही. काही भागात कांदा होत नाही. भविष्यातही होणार नाही. कांद्याची देशात व जगात सातत्याने मागणी वाढत जाणार असून १० आणि १५ रुपये प्रति किलोने कांदा आपल्याला परवडतो असे म्हणून आपणच आपल्या कांद्याचे मूल्य कमी करून घेण्यास जबाबदार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कांद्याच्या पिकासाठी
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ काबीज करून आज जगातील ज्या ज्या देशांमध्ये कांदा निर्यात होतो. यापेक्षाही अधिक देशांना आपला महाराष्ट्रीयन कांदा कसा विक्री करता येईल व तेथील बाजारपेठा कशा काबीज करता येतील यासाठी सबंध महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना संघटित करून त्याचे प्रचंड मोठे मार्केटिंग करून कांद्याचे पिकवण्या पासून विक्री पर्यंतचे सर्वच सूत्र कांदा उत्पादकांच्या हातात आणण्याचे काम महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या ६ वर्षांपासून सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
राज्यातील, देशातील कुठल्याही राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना इतर कुठल्याही घटकांना बांधील नसल्याने कांद्याच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र काम करत आहे. आपण सर्व कांदा उत्पादकांनी आपल्याच कांदा पिकाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
आपली किंमत