शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

…तर १६ ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद; कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

by Gautam Sancheti
ऑगस्ट 1, 2022 | 10:26 am
in स्थानिक बातम्या
0
kanda

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांनी आपापल्या चाळींमध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये कांद्याची साठवणूक केलेले असून खराब हवामानामुळे चाळींमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर बाजार समितीत कांदा विक्री केल्यास मातीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान सुरू आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर मिळावा अन्यथा येत्या १६ ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.

देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी २५ रुपये दर मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी यावेळी दिली.

दिघोळे म्हणाले की स गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढल्यावर तात्काळ एका दिवसात कांदा निर्यातबंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, कांदा व्यापाऱ्यावरती धाडी टाकणे, कांदा साठ्यावर मर्यादा घालणे अशा विविध क्लुप्त्या वापरून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून केले जाते मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे अशावेळी सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे

आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही गेल्या काही महिन्यांत रास्तारोको, मोर्चे,आंदोलने, राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून तसेच कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदादराप्रश्नी आवाज उठवला आहे पाठपुरावा केलेला आहे. परंतु तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावले उचलले गेले नाहीत.

एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना या वर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला परंतु नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा १० ते १२ रुपये प्रति किलो याप्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला २० ते २२ रुपये येत असतांना शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून कांद्याला सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर मिळत आहे.

Onion Growers Association Warning Rates

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विशेष लेखमाला – क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद – भाग – १

Next Post

बघा….रंगीत खडूच्या माध्यमातून फलक रेखाटन (व्हिडीओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
20220801 104743

बघा....रंगीत खडूच्या माध्यमातून फलक रेखाटन (व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011