निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
वातावरणाशी दोन हात करीत हाती आलेला उन्हाळी कांदा आता शेतकऱ्यांच्या हातुन जातो की काय अशी भीती वाटू लागली आहे, वातावरणातील अचानक होत असलेला बदल बेमोसमी पावसाची दमदार होत असलेली हजेरी यामुळे शेतकरीला मेटाकुटीस आला आहे.
अनेक शेतकऱ्यांची कांदे काढणीस आले आहेत तर अनेकांचे कांदे काढुन शेतात पडले आहेत अश्या स्थितीत वादळ वारे चा संघर्ष करीत शेतकरीने काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी हजारो रुपये ताडपत्री, प्लास्टीक वर खर्च करत आहे. मात्र वादळामुळे ताडपत्री कागद हवेने उडून जात असल्यामुळे कांदा भिजत आहे. एकीकडे कवडीमोल भाव कांद्याला मिळत असताना दुसरीकडे अस्मानी संकाटने शेतकरी पुर्ता हवालदिल झाला आहे. हात तोंडाशी आलेला घास हातातुन जाण्याची भीती आता वाटू लागली आहे.
एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक खराब हवामान व बेमोसमी पावसामुळे संकटात सापडले आहे .गत तीन महिन्यात अनेक वेळा वातावरणातील झालेल्या बदलामुळे महागडी औषधें फवारणी करून कांदा पीक शेतकऱ्यांनी वाचीविले आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीच उत्पादन निम्यावर आलेले असतांना आता बेमोसमी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे. महसूल विभागाने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
Onion Farmer Climate Change Agriculture Loss