नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजता चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी दिली आहे
कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसेच भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई –आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथे आज शुक्रवार दि. १० मार्च रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे.
कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस,पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दयावा आदी मागण्यासाठी करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात नेते, शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.
Onion Crisis Rasta Roko Chandwad NHAI Today