मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीजचोरी प्रकरणात ग्राहकास एक वर्षाचा तुरुंगवास; गडहिंग्लज न्यायालयाचा निकाल

by India Darpan
सप्टेंबर 12, 2022 | 4:50 pm
in स्थानिक बातम्या
0
court 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४० वर्ष) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे २ लक्ष ५० हजार रूपयांची वीजचोरी केली होती.

१९ नोव्हेंबर २०१५ रोजी ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील वीजग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांचे सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. अँक्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीज मीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. सदर वीज मीटरची गडहिंग्लज येथे दि. २० नोव्हेंबर २०१५ रोजी वीज भार तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या वीजभार तपासणीत वीजमीटर ७५.९४ टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. दि. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर येथील वीज तपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीज मीटर तपासले. या तपासणीत वीज मीटरमध्ये वीज वापर कमी नोंदवला जावा, अशा पध्दतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.

ग्राहकाने सदरील वीजचोरीच्या २२ फेब्रुवारी २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५ या निर्धारित १९ महिने कालावधीत २४ हजार ६७५ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू. २ लक्ष ५० हजार व तडजोडीचे रक्कम रू. १ लक्ष ५० हजार इतके बिल देण्यात आले होते. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा २००३, कलम १३५ व १३८ अन्वये भाऊराव संभाजी पाटील यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व १० हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.

सदरील प्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) निवृत्त कमांडर श्री. शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अमित बोकील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. सुनिल तेली यांनी कामकाज पाहिले.

One year imprisonment for consumer in electricity theft case

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चोरट्यांनी फोडले मेडिकल दुकान; चोरटे सीसीटीव्हीत कैद (बघा व्हिडीओ)

Next Post

नाराजी नाट्यावर प्रथमच अजित पवार यांनी दिली ही प्रतिक्रीया

India Darpan

Next Post
Ajitdada 3

नाराजी नाट्यावर प्रथमच अजित पवार यांनी दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011