इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बनावट नोटा तयार करून त्या चलनात किंवा बाजारात आणण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. सर्व समाजासाठी अत्यंत धोकादायक आणि देशाच्या विकासाला घातक ठरणार हा गैरप्रकार बंद व्हावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येतात. तरीही गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून बनावट नोटा छापण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.
त्यामुळेच सुमारे पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने याला पायबंद बसावा म्हणून नोटाबंदी जाहीर केली होती. परंतु त्यानंतर ही बनावट नोटाचे प्रकार काही कमी झालेले दिसून येत नाही. विशेषतः पैसे 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
इतकेच नव्हे तर अलीकडच्या काळात 10, 20 आणि 50 रुपयाच्या नोटा देखील बाजारात आल्याचे सांगण्यात येते. परंतु किरकोळ म्हणजे 1 रुपयाचे मूल्य असलेल्या बनावट नोटा छापण्याचा वाईट उद्योग काही समाज कंटक करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोटाबंदीनंतरच्या पाच वर्षांत 1 रुपयाच्या सुमारे 6 हजार बनावट नोटा पकडल्या, गेल्याचा अहवाल एनसीआरबीने दिला आहे. भारत सरकारने जारी केलेल्या 1 रुपयाच्या नोटेसारख्याच दिसणाऱ्या खोट्या नोटा बाजारात उतरवण्यात आल्या. या नोटाही चलनात आल्याने सरकारी यंत्रणा तपासात अडकल्या आहेत.
अनेक चलनाच्या भरपूर बनावट नोटा वाढत असताना दुसरीकडे या काळात दोन रुपयांची एकही बनावट नोट पकडली गेली नाही. दोन रुपयांची नोट अजूनही चलनात आहे, पण बाजारात एकही बनावट नोट नाही. मात्र, दोन हजार आणि पाचशेच्या बनावट नोटांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहेत. एका अहवालानुसार 2016 ते 2020 दरम्यान सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त मुल्य असलेल्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. एवढेच नाही तर बंद झालेल्या 1 हजाराच्या बनावट नोटा सापडत आहेत. 2016 मध्ये सुमारे 82 हजार बनावट नोटा होत्या आणि 2020 मध्ये ही संख्या सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त झाली.
कमी-अधिक प्रमाणात तीच स्थिती दोन हजाराच्या नोटांच्या बाबतीत राहिली. नोटाबंदीनंतर 2016 मध्ये चलनात आलेल्या 2 हजार मूल्यांच्या सुमारे 2200 बनावट नोटा पकडल्या गेल्या, त्यानंतर 2020 मध्ये ही संख्या सुमारे 2 लाख 45 हजारांवर पोहोचली. बनावट नोटांचे ठग किंवा समाज कंटक किती पुढे जाऊ शकतात, याची कल्पना आपण शकत नाही. 500 आणि 50 रुपयांच्या जुन्या बनावट नोटा मिळवण्याचा क्रम सुरूच होता. 50 रुपयांच्या जुन्या बनावट चलनाचा वेग थांबल्यानंतर या मूल्याच्या नव्या चलनाची नक्कल करण्याच्या प्रकाराला वेग आला. 50 रुपयांच्या नव्या बनावट नोटा 2020 मध्ये सुमारे 8600 च्यावर पकडण्यात आल्या.
अर्थशास्त्राचा नियम आहे की, लहान चलनाचे कमी डुप्लिकेशन होते गेल्या दोन वर्षात 5 आणि 10 रुपयांची एकही बनावट नोट पकडली गेली नसल्याचे दिसून येते. किंबहुना, छोट्या नोटांची नक्कल करण्यात खर्च आणि जोखीम दोन्ही जास्त आहेत, तर 2000 च्या बनावट नोटा छापण्याइतकेच धोके आहेत. विनाकारण बनावटगिरीत अडकू नये म्हणून फसवणूक करणारे लहान नोटांची कमी डुप्लिकेशन करतात. परंतु आता एक रुपयाचे चलनही डुप्लिकेट किंवा बनावट आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.