सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
OnePlus ने चीननंतर आता भारतीय बाजारपेठेत OnePlus Buds Z2 हा आधुनिक इयरबड लॉन्च केला आहे. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या OnePlus Buds Pro पेक्षा अर्ध्या किंमतीत तो उपलब्ध आहे. त्यासारखे आणि अन्यही अनेक फीचर्स यात आहेत. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने सर्वप्रथम OnePlus Buds Z2 ची घोषणा चीनमध्ये OnePlus 9RT च्या लॉन्च सोबत केली होती. आता तीन महिन्यानंतर कंपनीने अखेर ते भारतात लॉन्च केले आहेत.
OnePlus Buds Z2 हे २०२० मध्ये आलेल्या Buds Z चे अपग्रेड व्हर्जन आहे. यामध्ये सक्रीय आवाज रद्द करणे, दीर्घ बॅटरी आयुष्य, उत्कृष्ट ऑडीओ यासह बरेच काही फीचर्स आहेत. OnePlus Buds Z2 चे सर्वात महत्वाचे विशिष्ट म्हणजे, सक्रीय आवाज रद्द करणे म्हणजेच अॅकटिव्ह नोईज कॅन्सलेशन. Buds Pro प्रमाणेच 40db पर्यंत सक्रीय आवाज रद्द करण्याची ऑफर Buds Z2 देत आहेत.
निवडक उपकरणांवर आतील बाजूस डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह ११ मिमी बास ट्यून डायनॅमिक ड्राईव्हर सेटअप आहे. वायरलेस कनेक्टीव्हिटीसाठी, तुम्हाला AAC/SBC कोडेक्ससाठी समर्थनासह ब्लूटूथ 5.2 कनेक्टीव्हिटी मिळते. भारतात हा इयरबड ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हे बड्स काळ्या व सफेद रंगात ग्राहकांना मिळत आहेत. १८ जानेवारी पासून flipkart, amazon आणि OnePlus च्या अधिकृत वेबसाईट वर OnePlus Buds Z2 उपलब्ध असतील.