देवळा – तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कामगारांने अल्प काळात सर्व खातेदार व अधिकांऱ्याचा विश्वास संपादन करून खातेदारांच्या खात्यावरील रक्कमा परस्पर वळत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत ३२ खातेदारांच्या खात्यावरील १ कोटी ५० लाख ७० हजार रुपये परस्पर वळते केल्याची माहिती समोर आली आहे. अजून शेकडो खातेदारांनी पोलिस ठाण्यात तक्रारी संदर्भात अर्ज दाखल केले जात आहेत. भगवान आहेर नामक कर्मचारी यांनी बँक अधिकारी यांना न सांगता परस्पर लोकांकडून डुप्लिकेट सह्या करून त्यावर बँकेच शिक्के मारून तसेच लोकांनी विश्वासाने दिलेले चेक परस्पर वटवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा संशय आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजे पासून ते संध्याकाळी साडे आठ पर्यंत , भऊर व विठे्वाडी, खामखेडा या तीन चार गावातील खातेदार यांनी मध्य मुदत अल्प मुदतीचे तसेच सेविंग खाते चेक करण्यासाठी गर्दी केली आहे. तसेच गावात खूप गर्दी झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात बँकेत पडताळणीचे काम काम चालू आहे. झालेल्या अपहारांची व्याप्ती लक्षात घेऊन मालेगाव येथील महाराष्ट्र बंकेचे विभागीय व्यवस्थापक भोईर यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई संदर्भात देवळा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, बगडु, सावकी,खामखेडा, मटाणे या पाच सहा गावांतील शेतकरी व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली हक्काची व भरवश्यांची बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आपले खाते उघडले. जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असल्याने परीसरातील शेतकरी व नागरिकांनी पर्याय म्हणून महाराष्ट्र बँकेला प्राधान्य दिले होते. बहुतांश शेतकऱ्यांनी पिक कर्ज, मध्यमुदत कर्ज, महाराष्ट्र बॅकेमार्फत उचलले आहे. शेकडो खातेदारांनी कोट्यवधी रुपयांच्या अल्प बचत, मध्यमुदत, दिर्घ मुदतीच्या ठेवी ठेवलेल्या आहेत.