मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुपरहिरो असलेला शक्तीमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी पिक्चर्सने शक्तीमानचा टीझर प्रसारित केला आहे. त्यामुळे आता शक्तीमान हा 90 च्या दशकातील मुलांचा आवडता सुपरहिरो पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. पण यावेळी तो छोट्या ऐवजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सोनी पिक्चर्सने अलीकडेच घोषणा केली की, ते भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरहिरो शक्तीमानला परत आणत आहेत. त्यामुळे आता आपण सर्व जण आपले जुने दिवस पुन्हा आठवू शकतो. तसेच शक्तीमान पुन्हा पाहू शकतो. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हा चित्रपट तीन भागात असणार आहे. शक्तीमानची भूमिका साकारणारा अभिनेता मुकेश खन्नाही या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे. शक्तीमान चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी तो एक आहे. मात्र सिनेमा रिलीजची तारीख, किंवा शक्तीमानची मुख्य भूमिका कोण साकारणार आहे. याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नसून, फक्त टीझर समोर आला आहे. सोनी पिक्चर्सने या चित्रपटाबाबत ट्विट केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतात आणि जगभरातील आमच्या अनेक सुपरहिरो चित्रपटांच्या सुपर यशानंतर आता आमच्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे.
https://twitter.com/SonyPicsIndia/status/1491745566962774016?s=20&t=7ar6HsRxmFkwwcGUFGTJ0g
मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा प्रकल्प बर्याच काळापासून वेगाने सुरू आहे, परंतु ते त्याची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. चित्रपटाची अखेर घोषणा झाली याचा मला आनंद आहे. शक्तीमानला परत आणण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी दिलेली आश्वासने तो पूर्ण करू शकतो. शक्तीमान ही मूळ टीव्ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत होती. हा शो 1997 मध्ये सुरू झाला आणि 2005 पर्यंत यशस्वीपणे चालला. तो मुलांचा आवडता शो बनला. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी शक्तीमान आणि पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री यांची भूमिका साकारली होती. किट्टू गिडवानी, वैष्णवी, सुरेंद्र पाल आणि टॉम अल्टर हे देखील या शोचे महत्त्वाचे पात्र होते.
https://twitter.com/actmukeshkhanna/status/1492484334343061506?s=20&t=F7f_2QhK8reC5OitcwzfNg