धाराशिव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –विधाससभा निवडणुकीत आता प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. काही ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप – प्रत्यारोपही होऊ लागले. धाराशीवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराज निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौ-यावर हल्लाबोल केला. त्यांनी यावेळी भाजपवरही गंभीर आरोप केला.
खासदार निंबाळकर म्हणाले की, शिवसेना पक्ष असाच सहज फुटला नाही. एकनाथ शिंदे यांच्या जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन दबाव टाकला. शिवसेना पक्ष फोडून येतो की जेलात जातो असे सांगितले. त्यामुळे पक्ष सोडून एकनाथ शिंदेसह आमदार गेले. तर अजित पवार यांचा ७० कोटीचा घोटाळा काढला अन अजित पवार सातव्याच दिवशी यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाले.
यावेळी त्यांनी सांगितले की, भाजप हे कटकारस्थानी असून महाराष्ट्रीतल राजकारण नासावून टाकायचे काम भाजपने केले आहे. शेतक-यांना देशोधडीला लावले असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील याच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.