नवी दिल्ली – कोणते संकट कुणाचे काय नुकसान करेल, हे सांगता येत नाही. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने जगभरातील सर्वच नागरिकांचे नुकसान केले परंतु आता सध्या दक्षिण आफ्रिकेत आलेल्या नव्या प्रकारातील विषाणूने जगभरातील सर्वात श्रीमंत अशा व्यक्तींचे देखील नुकसान झाले आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या भितीने आणि दहशतीने जगभरातील शेअर बाजार हादरले आहेत. विषाणूच्या या नवीन स्वरूपाने केवळ बाजारपेठाच ठप्प बनल्या नाहीत तर जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या संपत्तीत सुमारे 38 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट, झुकेरबर्ग, बिलगेट्स यांच्यासह सर्व टॉप 10 श्रीमंतांची एकूण संपत्ती 38 अब्ज डॉलर म्हणजेच 28,44,58,50,00,000 रूपये इतकी गमावली आहे. तर भारतीयापैकी गौतम अदानी यांना सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्यांना 12.4 अब्ज डॉलरचा धक्का बसला.
सध्या दक्षिण आफ्रिका, चीन, बोत्सवाना, यूके, ब्राझील, इस्रायल, बांगलादेश, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर आणि हाँगकाँग या युरोपातील देशांनी या विषाणूच्या प्रभावामुळे जगाला अलर्ट मोडवर ठेवले आहे. एलोन मस्कला गेल्या आठवड्यात 8.38 अब्ज डॉलर्सची घट झाली होती. त्याच वेळी, जेफ बेझोस यांना 3.90 अब्ज डॉलर्स आणि बर्नार्ड अर्नॉल्टला 8.26 अब्ज डॉलर्स तर बिलगेट्सच्या संपत्तीत 2.68 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे.
त्याचप्रमाणे लॅरीपेजची संपत्ती 3.14 अब्ज डॉलर्स इतकी आहे, तर मार्क झुकरबर्गची संपत्ती 2.93 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सर्जी ब्रिन, स्टीव्ह व्हॉल्मर, लॅरी एलिसन आणि वॉरेन बफे यांनाही एक ते तीन अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. भारतीय अब्जाधीशांमध्ये तर मुकेश अंबानी यांना 3.68 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांना 12.4 अब्ज डॉलरचा धक्का बसला. या ओमिक्रॉनने सायरस पूनावाला वगळता भारतातील सर्व टॉप 10 अब्जाधीशांची संपत्तीत घट केली आहे.