मुंबई – ओमिक्रॉन विषाणूने आणखी हातपाय पसरल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पहिला ओमिक्रॉन विषाणूचा रुग्ण डोंबिवलीमध्ये आढळल्यानंतर आता आणखी ७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ८वर गेली आहे. नवे ७ बाधित हे पुण्यातील १ आणि पिंपरी-चिंडवडमधील ६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात ओमिक्रॉन विषाणूने चिंता निर्माण केली आहे. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. डोंबिवलीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता आणखी ७ रुग्ण आढळले आहेत. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये तिघांनी कोरोन प्रतिबंधक लस घेतल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी चिंचवडमधील सहा बाधितांपैकी तिघे जण नायजेरियाहून आलेले आहेत. तर, अन्य तिघे त्यांच्या संपर्कात आलेले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात एक महिला, ४५ वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि १७ वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. या सर्व जणांना कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. या सर्व जणांना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1467483864939446281?s=20