रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

by India Darpan
जून 22, 2025 | 7:06 pm
in स्थानिक बातम्या
0
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २३ जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस उत्साहात साजरा करण्याच्या हेतूने गेल्या १६ वर्षापासून नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम्स असोसिएशन, कालिका मंदिर, यशवंत व्यायाम शाळां आणि विविध क्रीडा असोसिएशन यांच्या वतीने अनेक क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. उद्या दिनांक २३ जून रोजी सकाळी ८.३० वाजता क्रीडा रॅलीला सुरवात होणार आहे. काळाराम मंदिर, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, यशवंत व्यायाम शाळा, मेहेर चौक, सी. बी. एस. चौक, गडकरी चौक आणि कालिका देवी मंदिर असा या रॅलीचा मार्ग असणार आहे. काळाराम मंदिर येथे प्रमुख पाहुणे ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त जफर इक्बाल यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या क्रीडा रॅलीला सुरवात करण्यात येणार आहे.

आज जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. नाशिकच्या क्रीडा संघटक विंग कमांडर प्रदीप बागमार नितीन हिंगमिरे, अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, शशांक वझे यांनी पुष्पगुछ प्रदान करून त्यांचे स्वागत केले. उद्याच्या रॅलीमध्ये विविध खेळांचे १५० खेळाडू सहभागी होणार आहेत.
यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, हेमंत पांडे, चंद्रशेखर सिंग, दिपक पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे आणि सर्व खेळांचे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यानंतर दिनांक २३ ते ३० जून या ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहां अंतर्गत बास्केटबॉल, तलवारबाजी, व्हॉलीबॉल, मिनी फुटबॉल, कॅरम, टेनिस व्हॉलीबॉल, गोल्फ, टेबल टेनिस, सेपक टकरा अश्या विवीध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बास्केटबॉल, तलवारबाजी, व्हॉलीबॉल, मिनी फुटबॉल, कॅरम, टेनिस व्हॉलीबॉल तसेच वरिष्ठ गटाच्या गोल्फ स्पर्धा आणि ३९ वर्षावरील टेबल टेनिस स्पर्धा या विविध स्पर्धांचा समावेश आहे.

नाशिकच्या क्रीडा प्रेमीनी या उपक्रमात उत्स्पूर्तपणे सहभागी व्हावे आणि हा ऑलीम्पिक सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन, यशवंत व्यायाम शाळा, कालिका देवी मंदिर यांचे पदाधिकारी आणि विवीध खेळांचे पदाधिकारी, प्रशिक्षक यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Next Post

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

India Darpan

Next Post
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011