टोकियो – ऑलिम्पिकचा सोळावा दिवस भारतासाठी सुवर्ण अक्षरांनी नोंदविणारा ठरला आहे. भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने इतिहास घडवत सुरर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. २००८ मध्ये नेमबाजीत अभिनव बिंद्राने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर नीरजने ही कामगिरी केली आहे.
पहिल्या तीन फेर्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. नीरजने पहिला फेक ८७.५८ मीटर, दुसरा ८७.५८ मीटर आणि तिसरा फेक ७६.७९ मीटर लांब केला. चेक रिपब्लिकच्या वडलेजने ८६.६७ मीटर आणि वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. वडलेजला रौप्य आणि वेसेलीला कांस्य पदक मिळाले. अंतिम फेरीत नीरजसह १२ स्पर्धक सहभागी झाले होते
नीरजच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारताला तब्बल १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. यापीर्वी २००८ मध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक प्राप्त झाले होेते.