नवी दिल्ली – दिवंगत ऑलिम्पिक विजेता खेळाडू अॅलेक्स ‘चॅम्पी’ पुलिनच्या विधवा पत्नीने पतीच्या मृत्यूनंतर 15 महिन्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे या खेळाडूच्या अनेक आठवणींना उजळा मिळाला तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
दोन वेळा विश्वविजेता स्नोबोर्डर अॅलेक्स पुलिनचा जुलै 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये मासेमारी करताना वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला. वास्तविक अॅलेक्स पुलिन हे सोची (रशिया) येथील 2014 हिवाळी ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियन दलाचे ध्वजवाहक होते. त्यांनी एकूण तीन ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता. अलिदी पुलिन हिने इन्स्टाग्रामवर आई झाल्याची माहिती दिली. अलिदी 25 ऑक्टोबरला आई झाली. तसेच मुलीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, ‘आमची मुलगी.’ बघा.. अलिदीच्या मुलीचे नाव मिनी अॅलेक्स पुलिन असे ठेवले आहे. या बाळाचा जन्म आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) द्वारे झाला आहे, असे आलिदीने स्पष्ट केले आहे. या बाळाचा जन्म झाला झाल्यानंतर मात्र अलीदीने तीन दिवसांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. अलिदीचा पती अॅलेक्स ‘चॅम्पी’ पुलिन हा एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जात होता.
दरम्यान, एलिडी पुलिनने जूनमध्ये जाहीर केले होते की ती गर्भवती आहे. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, ती आणि तिचा दिवंगत पती ” अनेक वर्षांपासून त्यांच्या बाळाचे स्वप्न पाहत होते. तिने म्हटले की, ‘तुझे बाबा आणि मी वर्षानुवर्षे तुझ्या येण्याचे स्वप्न पाहत आहोत. मध्यंतरी एक हृदयद्रावक घटना घडली. आता तुझे स्वागत आहे. ‘