पुणे – भारतीय बाजारपेठेत एलईडी, OLED, QLED डिस्प्ले असलेले स्मार्टफोन लवकरच येणार आहेत. सध्या सॅमसंग सारख्या अनेक कंपन्या त्यांच्या प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन मध्ये OLED पॅनेल वापरतात. OLED एक प्रकारची LED ची नवीन आवृत्ती असून ते एलईडी डिस्प्लेपेक्षा चांगले आहेत. कारण एलईडी पॅनल्सपेक्षा ते कमी वीज वापरते. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत नाही. बाजारात लवकरच येणारे सर्वोत्तम OLED स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असून त्याबद्दल जाणून घेऊ या…
सॅमसंग गॅलेक्सी ए 20
सॅमसंग गॅलेक्सी ए 20 मध्ये 6.4-इंच एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन Exynoss 7884 प्रोसेसरने सपोर्ट केला आहे. यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्राइमरी रिअर कॅमेरा 13MP आहे. याशिवाय 5MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या मागील पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 11,490 रुपये आहे.
Xiaomi Redmi Note 10
या Redmi Noe 10 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंच FHD प्लस AMOLED डिस्प्ले आहे. तसेच क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध असेल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. रेडमी नोट 10 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP सेंसर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 13 एमपी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत – 13,999 रुपये आहे.
Realme 8
Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा FHD प्लस OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डायमेंशन 700 5G फोनमध्ये प्रोसेसर म्हणून वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा एक कॅमेरा 48MP , दुसरा कॅमेरा B&W कॅमेरा आणि मॅक्रो लेन्ससह उपलब्ध असेल. हा फोन 5 नाईटस्केप फिल्टरसह असून त्यात समोर 16MP कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 18W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज केली जाऊ शकते.
या फोनची किंमत – 14,990 रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एफ 41
सॅमसंग गॅलेक्सी F41 हा फोन Android 10 OS वर कार्य करतो आणि यात 6.4-इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड इन्फिनिटी-यू डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 64MP आहे, तसेच त्यात 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे आणि 5MP चा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी यात 6,000mAh ची मजबूत बॅटरी आहे. या फोनची किंमत – 14,999 रुपये आहे.
ओप्पो एफ 17 प्रो
हा फोन Android 10 OS वर काम करतो आणि मीडियाटेक हेलियो P95 प्रोसेसर वर सादर करण्यात आला आहे. यामध्ये 6.43-इंच फुल HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 48MP चा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, 8MP चे दुय्यम सेन्सर आणि इतर दोन सेन्सर 2MP चे आहेत. फोनमध्ये 16MP प्राइमरी सेंसर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तसेच यात पॉवर बॅकअपसाठी, 4,015mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनची किंमत – 18,499 रुपये आहे.