मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षीप्रमाणे यंदाही हेल्पएज इंडियाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधिक वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, देशातील १६ टक्के ज्येष्ठ महिला शिविगाळ आणि घरगुती छळ सहन करतात. या आकडेवारीने समाजसुन्न झाले असून ज्येष्ठ महिलांची बिकट परिस्थिती जगापुढे आली आहे.
दरवर्षी १५ जून रोजी वर्ल्ड एल्डर अब्युज अवेरनेस डे पाळण्यात येतो. या निमित्ताने हेल्पएज इंडिया वार्षिक अहवाल प्रकाशित करत असतो. यंदा त्यांनी भारतातल्या ६० ते ९० वर्ष या वयोगाटीतल ७,९११ महिलांचे सर्वेक्षण केले आहे. ‘वीमेन अँड एजिंग : इनव्हिजिबल ऑर एम्पावर्ड?’ असे शीर्षक या अहवालाला देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात संस्धेने अशा महिलांचा समावेश केला आहे ज्यांचं वेगवेगळ्या प्रकारे शोषण झालं आहे.
या सर्वेसाठी संस्थेने देशातल्या २० राज्यांमधील, २ केंद्रशासित प्रदेश आणि ५ मेट्रो शहरांमधील महिलांशी बातचित केली आहे. तसेच संस्थेने शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा यात समावेश केला आहे. या रिपोर्टनुसार भारतातल्या १६ टक्के वयस्कर महिलांशी दुर्व्यहार केला जातो. यापैकी अर्ध्याहून अधिक महिलांना मारहाण झाली आहे. तर ४६ टक्के महिला अनादर, अपमानित झाल्या आहेत. तर ३१ टक्के महिलांचा मानसिक छळ झाला आहे.
जन्मदात्या आईलाच दिला त्रास
हेल्पएज इंडियाच्या अहवालानुसार, जन्मदात्या आईला त्रास देण्यासदेखील मुले कमी नाहीत. महिलांचा छळ होत असताना त्यांच्या मुलांनी त्यांची साथ दिली नाही. ४० टक्के महिलांचा छळ करण्यात त्यांची मुलेही सहभागी आहेत. तसेच इतर नातेवाईकांकडून ३१ टक्के महिलांचा छळ झाला आहे.