कन्नौज (उत्तर प्रदेश) – येथील छिबरामऊमध्ये जीटी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सिंकदरपूर परिसरातील रायपूर येथे मातीचा ढिगारा खोदताना मोहरांनी भरलेला हंडा सापडला. जेसीबीचालक हंडा घेऊन फरारी झाला. मातीच्या ढिगार्याजवळ ग्रामस्थांना काही मोहरा सापडल्या. त्यांच्या धातूची ओळख पटविली जात आहे.
जीटी रोडच्या रुंदीकरणादरम्यान रायपूर गावात मातीचा ढिगारा खोदला जात होता. त्यादरम्यान जेसीबीचालकाला एक घडा सापडला. ग्रामस्थांनी सांगितले की, तो घडा मोहरांनी भरलेला होता. ही माहिती पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. मातीच्या घड्यामध्ये अॅल्युमिनिअमच्या मोहरा सापडल्या. या मोहरा सोन्या-चांदीच्या आहेत असे समजून जेसीबीचालक घडा घेऊन फरारी झाला. ग्रामस्थांना काही मोहरा सापडल्या आहेत.
मोहरांच्या धातूची ओळख पटविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत आहेत. भारतीय पुरातत्व विभागाला माहिती दिल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. जेसीबीचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विनोद कुमार मिश्रा सांगतात, त्यांना याबाबत काहीही माहिती नाही.
कन्नोज जिल्ह्यात सोमवारी सिंकदरपूरमधील रायपूर गावात मातीचा ढिगार्याच्या खोदकाम करताना मोहरा सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. सायंकाळपर्यंत मातीच्या ढिगार्याच्या जवळपास ग्रामस्थ माती खोदून मोहरा शोधण्याचा प्रयत्न करत होते.