१८ मिनिटांच्या चार्जिंगला दुचाकी देईल प्रचंड अॅव्हरेज रेंज…
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाचे भाव गगनाला भिडले असून भविष्यात हे इंधन संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच यापूर्वी पर्यावरण पूरक वाहनांचा वापर करावा, यासाठी सरकारतर्फे ही प्रोत्साहन देण्यात येत आहे सहाजिकच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणले आहेत. ओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरसाठी केवळ ४९९ रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली आहे.
इच्छुक ग्राहक ओला स्कूटर olaelectric.com या अधिकृत वेबसाईटवर ई-स्कूटर बुक करु शकतात.यात प्रारंभिक ग्राहकांना प्राधान्य देण्याची तरतूद असेल. या स्कूटर बद्दल सातत्याने दावे केले जात आहेत, त्यानुसार ओलाचे आगामी इलेक्ट्रिक स्कूटर केवळ १८ मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करेल. या स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज जवळपास १५० कि.मी. इतकी असेल, तर असे म्हणता येईल की ते १८ मिनिटांच्या चार्जमध्ये ७५ कि.मी.पर्यंतची अॅव्हरेज देईल. तसेच जेव्हा भारतात ही स्कूटर लॉन्च होईल, तेव्हा अॅथर ४५० एक्स आणि टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतकशी स्पर्धा करेल.
एका अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस ही दुचाकी लॉन्च केले जाऊ शकते, त्याची किंमत १ लाख ते १ लाख २० हजारांपर्यंत (एक्स-शोरूम) च्या श्रेणीत सांगितली जात आहे. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्य सूची बाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर जाहीर केले की, स्कूटरमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस, अॅप-आधारित की लेस अॅक्सेस आणि सेगमेंटमधील श्रेणी सांगितली जाईल.
India’s EV revolution begins today! Bookings now open for the Ola Scooter!
India has the potential to become the world leader in EVs and we’re proud to lead this charge! #JoinTheRevolution at https://t.co/lzUzbWtgJH @olaelectric pic.twitter.com/A2kpu7Liw4— Bhavish Aggarwal (@bhash) July 15, 2021