नवी दिल्ली – देशात बहुप्रतिक्षीत असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती नक्की कशी होत आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनीच हा व्हिडिओ सादर केला आहे. त्यात दिसून येत आहे की, कंपनीच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत. म्हणजेच, महिलाच स्कूटरची निर्मिती करीत आहेत. ओलाची स्कूटर १८ मिनिटात चार्ज होईल आणि ती ७५ किलोमीटर चालू शकेल. देशातील ४०० शहरांमध्ये १ लाख चार्जिंग स्टेशन उभारण्याचीही ओलाची योजना आहे. बघा, ओला स्कूटर निर्मितीचा व्हिडिओ
https://twitter.com/bhash/status/1453252411678679043