नवी दिल्ली – ओला इलेक्ट्रिकचे देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक बनण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या स्कूटरमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. पण स्कूटर खरेदी केल्यानंतर काही ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. स्कूटरची कामगिरी चांगली नाही, अशा तक्रारी ऑनलाइनरित्या नोंदवल्या आहेत. याची दखल कंपनीने घ्यावी अशी मागणीही केली आहे.
हेडलाइट
एका स्कूटर यूजरने सांगितले की, डिलिव्हरीनंतर लगेचच त्याच्या Ola S1 Pro मध्ये समस्या येऊ लागल्या. स्कूटर सुमारे 6 किमी चालवल्यानंतर त्यातून आवाज येऊ लागला आणि हेडलाइटशी संबंधित समस्या देखील समोर आली. यानंतर स्कूटर दुरुस्तीसाठी नेण्यात आली. स्कूटर परत केली असता, स्कूटरवर तुटलेली नंबर प्लेट आणि तेलाचे डाग यांच्या खुणा मालकाच्या लक्षात आल्या.
कागदपत्रे
ओला इलेक्ट्रिकने तक्रार केलेल्या समस्यांचे निराकरण करण्याची ऑफर दिली आहे. याशिवाय, स्कूटर मालकाने सांगितले की, स्कूटर सर्व्हिस टीमकडे असताना सुमारे 19 कि.मी. वापरण्यात आली. मात्र सर्विस बुक किंवा सेवेची कागदपत्रेही त्यांना दिली गेली नाहीत, अशी त्याची तक्रार होती.
ओलाचे स्पष्टीकरण
ओला इलेक्ट्रिकचे मुख्य व्यवसाय अधिकारी अरुण सरदेशमुख यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, सुमारे 4 हजार ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स अनेक शहरांमधील ग्राहकांना वितरित करण्यात आल्या आहेत आणि ग्राहकांनी उपस्थित केलेल्या समस्यांपैकी बहुतांश समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.
स्कूटरची किंमत
ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro या दोन प्रकारात येतात. S1 किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 Proची किंमत 1.30 लाख रुपये आहे. S1 व्हेरिएंट ही 121 किलोमीटरची रेंज कव्हर करण्याचा दावा करते, तर अधिक महाग S1 प्रो रिचार्ज करण्यापूर्वी सुमारे 180 किलोमीटरचा प्रवास करण्याचा दावा करते.
स्कूटरची वैशिष्ट्ये
Ola S1 8500 W मिड ड्राइव्ह IPM मोटरने सुसज्ज आहे. Ola S1 ची 3.97 kWh बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6.30 तास घेते. Ola S1 ची किंमत रु. 85 हजारापासून सुरू होते आणि रु. 1.10 लाखपर्यंत जाते. हे एसटीडी आणि प्रो या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. Ola S1 ला 2.98 kWh न काढता येणारी बॅटरी मिळते तर S1 Pro ला 3.97 kWh युनिट मिळते. तसेचफुल चार्जवर 121 किमी आणि 181 किमीची राइडिंग रेंज देतात. याशिवाय, यात पोर्टेबल होम चार्जर देखील मिळतो जो 4.4 तास आणि 6.30 तासांमध्ये स्कूटरला पूर्णपणे चार्ज करू शकतो. या स्कूटर्सना पॉवरिंग 8.5kW (11.3 hp) आणि 58 Nm टॉर्कच्या पीक पॉवर आउटपुटसह हायपर ड्राइव्ह मोटर आहे.