विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
पेट्रोल डिझेल सारखे इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. विशेषत : ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे तरुणांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचाच कल दिसून येतो. विशेष म्हणजे या स्कूटर साठी अनेक बँका देखील कर्ज देऊ लागल्या असून त्याचा इएमआय हा अत्यंत माफक आणि सर्वांना परवडणारे आहे. ओला कंपनीने नुकतीच देशांतर्गत बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 लाँच केली. तसेच आता या कंपनीने सदर स्कूटरसाठी वित्त सुविधा पुरवण्यासाठी देशातील विविध बँकांसोबत भागीदारी करत असल्याचे जाहीर केले आहे. ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना कर्ज देण्यासाठी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा प्राइम व टाटा कॅपिटलसह विविध आघाडीच्या बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे.
त्याचप्रमाणे ओलाने ज्या इतर बँकांशी करार केला आहे त्यात बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, जना स्मॉल फायनान्स बँक आणि येस बँक यांचा समावेश आहे. ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री उद्यापासून सुरू होणार आहे. याबाबत ओला इलेक्ट्रिकले एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व प्रमुख बँका आणि (आर्थिक) संस्थांशी करार केला आहे. ८ सप्टेंबर रोजी स्कूटरसाठी वित्तपुरवठा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सदर सेवा इतर बँकांसह लवकरच सुरू केली जाईल, त्याचा सर्व ग्राहकांना लाभ घेता येईल. सदर स्कूटरला वित्तपुरवठा करताना त्यांना स्कूटर आणि कर्जासंबंधी सर्व माहिती दिली जाईल. मंजुरीची रक्कम काय आहे, किंवा काय त्यांना काय करण्याची गरज आहे. याशिवाय, आमच्याकडे फक्त २,९९९ रुपयांच्या मासिक हप्त्यासह (EMI) अतिशय आकर्षक वित्त पर्याय आहे.
विशेष म्हणजे ओला कंपनीने ही स्कूटर S1 आणि S1 प्रो या दोन प्रकारांमध्ये लाँच केली आहे. ओला एस 1 ची किंमत फक्त ८५,०९९ रुपये आणि एस 1 प्रो व्हेरिएंटची किंमत १ लाख १० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सदर किंमत दिल्ली शहरातील आहे आणि त्यात राज्याने दिलेल्या अनुदानाचा समावेश आहे. या स्कूटरची सर्वात कमी किंमत गुजरातमध्ये आहे जिथे S1 मॉडेलची किंमत ७,९,९९९ रुपये आणि S1 प्रो ची किंमत १०९,९९९ रुपये आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये एक कृत्रिम ध्वनी प्रणाली दिली आहे, त्यामुळे वाहनचालक मूडनुसार स्कूटरचा आवाज बदलू शकतो. या स्कूटरमध्ये कंपनीने 4G कनेक्टिव्हिटी सिस्टीम दिली आहे, जेणेकरून ती सतत इंटरनेटशी जोडलेली राहील. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनला या स्कूटरशी जोडून सर्व वैशिष्ट्ये ऑपरेट करू शकता, ज्यात स्कूटरची लॉक किंवा अनलॉक प्रणाली देखील समाविष्ट आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 3.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर 8.5 kW पीक पॉवर जनरेट करते. 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरसह त्याची बॅटरी सुमारे ६ तासात पूर्णपणे चार्ज होईल, तसेच ही बॅटरी कंपनीच्या सुपरचार्जरद्वारे फक्त १८ मिनिटांत ५० टक्क्यां पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर १८० ते १९० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. अधिक माहितीसाठी ओलाच्या वेबसाईटला भेट द्या…