नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण पोलिस दलात लाचखोरीची कीड खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे. वडनेर भैरव येथील दोन पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले. त्याला एक दिवस उलटत नाही तोच ओझर पोलिस स्टेशनमधील हवालदार कारभारी भिला यादव हा २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. पंचवटीतील सीता गुंफा परिसरात हा सापळा रचण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी
श्री.कारभारी भिला यादव, वय 52वर्षे, व्यवसाय नोकरी- पोलीस हवालदार/1255, नेमणूक – ओझर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण. रा.पाथर्डी फाटा, ओम शांती को.ऑप.सोसा. नरहरीनगर, नाशिक
लाचेचीमागणी- 2,000/- रू.
लाच स्विकारली- 2,000/-रू.
हस्तगत रक्कम- 2,000/-रू.
लाचेची मागणी – दि.12/06/2022
लाच स्विकारली- दि.12/06/2022
लाचेचे कारण -.
तक्रारदार यांच्याविरुध्द् मा.न्यायालयात दाखल असलेल्या N.I.Act कलम 138 चेक बाउंस च्या केस मध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध मा. न्यायालयाने काढलेल्या पकड वारंट मध्ये तक्रारदार यांना मा.न्यायालयात हजर करण्यासाठी तसेच त्यांच्या विरुद्ध असलेल्या पकड वारंट मध्ये जमीनदार यांचे कागदपत्र घेऊन, पकड वारंट मध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून 2000/- रू. लाचेची ची मागणी करून सदर लाचेची रक्कम 2000/- रू. स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी- श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
सापळा पथक – पो हवा सचिन गोसावी, पो ना नितीन कराड, पो ना प्रवीण महाजन, पो ना प्रभाकर गवळी, नेम. अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
मार्गदर्शक- 1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
@ टोल फ्रि क्रं. 1064