मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-येवला महामार्गावर सकाळच्या सुमारास मनमाड कडून येणारा ऑइल टँकर व लसूण घेऊन मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपचा समोरा समोर अपघात झाला. या अपघाता तीन जण जखमी झाले.
अपघात नंतर टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. दरम्यान अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेत काढून खासगी रुग्णवाहिकेतून येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाता प्रकरणी येवला तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे.
Oil tanker-pickup accident on Manmad-Yewla highway