इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाचे बदल्याचे सत्र सुरुच असून वेगवेगळ्या विभागातील पाच अधिका-यांच्या आता बदल्या करण्यात आल्या आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अगोदर पाच आणि आता अजून पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. याअगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची बदली जालना जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली त्यानंतर आता त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यात
१.श्री तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: २००५) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२. श्री नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: २००७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३. श्री अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: २००७) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४. श्री ओंकार पवार (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना जिल्हा परिषद, नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
५. श्रीमती आशा अफजल खान पठाण (IAS:SCS:9999) सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर येथे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.