मुंबई – स्वस्त एसयूव्ही खरेदी करणार्या ग्राहकांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर कार कंपन्या सब कॉम्पॉक्ट एसयूव्हीवर मोठी सवलत देत आहेत. या लहान एसयूव्ही दीड लाखाच्या सवलतीवर खरेदी केल्या जाऊ शकतात. कोणत्या एसयूव्हीवर किती सवलत मिळतेय हे जाणून घेऊयात.
Mahindra XUV300
महिंद्राच्या या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ४४ हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. त्यामध्ये १५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, चार हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बेनिफिनचा समावेश आहे. कारची किंमत ७.९६ लाख रुपयांपासून १३.४६ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
Renault Kiger
रेनॉल्ट कायगरवर कोणताही कॅश डिस्काउंट किंवा एक्सचेंज बोनस मिळणार नाही. पण १० हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो. त्याशिवाय तुम्ही रेनॉल्टचे आधीपासूनच ग्राहक असाल तर तुम्ही ९५ हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बेनिफिटचा फायदा घेऊ शकतात. अशा प्रकारे कारवर १.०५ लाखापर्यंत सवलत मिळेल. रेनॉल्ट कायगरची किंमत ५.६४ लाखांपासून १०.०९ लाखांपर्यंत आहे. या कारचे फक्त पेट्रोलचेच इंजिन आहे. या सेगमेंटमधील ही सर्वात स्वस्त कार आहे.
Tata Nexon
या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर २० हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. कारच्या डिझेल व्हेरिएंटवर १५ हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजारांपर्यंतचे कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. पेट्रोल व्हेरिएंटवर फक्त ३ हजारांपर्यंचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाईल. या कारची किंमत ७.२८ लाखांपासून १३.२३ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
Maruti Vitara Brezza
या सेगमेंटची सर्वात अधिक विक्री होणार्या वाहनांपैकी ही एक आहे. या कारवर एकूण १७ हजार ५०० रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामध्ये ५ हजारांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, १० हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि २ हजार ५०० रुपयांपर्यंच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. विटारा ब्रेझाची किंमत ७.६१ लाखांपासून ते ११.१९ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
Toyota Urban Cruiser
टोयोटा अर्बन क्रूझरवर फक्त १५ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. विटारा ब्रेझावर आधारित ही सब-४ मीटर एसयूव्ही आहे. जास्त बचत करायची असेल तर तुम्ही विटारा ब्रेझाची निवड करू शकतात. टोयोटा अर्बन क्रूझरची किंमत ८.७२ लाखांपासून ते ११.४० लाखांपर्यंत उपलब्ध आहे.