मुंबई – प्रसिद्ध ई कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेजला (big saving days) प्रारंभ झाला आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्झी एफ ६२ (Samsung Galaxy F 62) स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फोनला ७००० mAh ची दमदार बॅटरी लाइफ मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी या दोन स्टोरेज व्हेरिएंटसह ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये फोन उपलब्ध आहे.
किंमत आणि ऑफर
Samsung Galaxy F 62 या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये ठरविण्यात आली आहे. तर ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या सेलमध्ये दोन हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट फोनवर देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आपल्या मुख्य किमतीपेक्षा १२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोनला आयसीआयसीआय बँके कार्डद्वारे खरेदी केल्यास दहा टक्के सवलत मिळत आहे. नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरमध्येसुद्धा फोनची खरेदी करू शकता येणार आहे.
फोनचे तपशील
Samsung Galaxy F 62 मध्ये ६.७ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2400 पिक्सल इतके त्याचे रिझॉल्युशन आहे. फोनला Exynos 9825 प्रोसेसरला सपोर्ट देण्यात आला आहे. अँड्रॉइड ११ आधारित OneUI 3.1 या ऑपरेटिंग सिस्टिमवर फोन काम करणार आहे. Samsung Galaxy F 62 च्या रियर पॅनलवर एक क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्याशिवाय 12MP अल्ट्रा वाइड लेंस, 5MP चा मायक्रो लेंसचा आणि 5MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या समोर 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 25W वेगाने चार्ज होणारी
7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचे वजन २१८ ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटी फिचर्समध्ये 4G VoLTE, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.